नवी मुंबईत सापडली २२ लाखांची रोकड

By Admin | Updated: October 11, 2014 03:42 IST2014-10-11T03:42:30+5:302014-10-11T03:42:30+5:30

एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नाकाबंदी सुरू असताना शुक्रवारी दोन वाहनांमधून २२ लाख २८ हजार रुपये रोख रक्कम सापडली.

22 lakh cash in Navi Mumbai | नवी मुंबईत सापडली २२ लाखांची रोकड

नवी मुंबईत सापडली २२ लाखांची रोकड

नवी मुंबई : एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नाकाबंदी सुरू असताना शुक्रवारी दोन वाहनांमधून २२ लाख २८ हजार रुपये रोख रक्कम सापडली. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून याचा निवडणुकीशी काही संबंध आहे याचा तपास सुरू आहे.
दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ नाकाबंदी सुरू असताना येथून जाणाऱ्या एमएच४३ एन ७३७३ या क्रमांकाच्या इनोव्हाची तपासणी केली. त्यावेळी गाडीमध्ये १८ लाख २८ हजार रूपयांची रोकड सापडली. ही रक्कम एक सिगारेट कंपनीची असल्याचे प्रथमदर्शनी संबंधितांनी पोलिसांनी सांगितले. याच ठिकाणी एमएच ४३ एजे ९२३३ या वॅगनआर कारमधून ४ लाख रुपये सापडले. सदर रक्कम मॅफ्को मार्केटमधील शितगृहचालकाची असल्याचे प्रथमदर्शनी समजले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.

Web Title: 22 lakh cash in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.