२२ बसफेऱ्यांमधून प्रतिदिन ४ हजार?
By Admin | Updated: July 3, 2015 22:45 IST2015-07-03T22:45:01+5:302015-07-03T22:45:01+5:30
केडीएमटीच्या बदलापूरसह अंबरनाथ- उल्हासनगर विस्ताराला आठवडा झाला. मात्र, परिवहनच्या खात्यात दिवसाला साधारणत: २२ बसफेऱ्यांमधून

२२ बसफेऱ्यांमधून प्रतिदिन ४ हजार?
डोंबिवली : केडीएमटीच्या बदलापूरसह अंबरनाथ- उल्हासनगर विस्ताराला आठवडा झाला. मात्र, परिवहनच्या खात्यात दिवसाला साधारणत: २२ बसफेऱ्यांमधून अवघे चार हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. आधीच परिवहन घाट्यात असताना केवळ परिवहनमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि सत्ताधाऱ्यांच्या गळचेपी धोरणामुळे विस्तार केलाच का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
परिवहन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बदलापूर-अंबरनाथ बसच्या प्रतिदिन सुमारे १२ फेऱ्या तर उल्हासनगरसाठी साधारणत: ८-१० फेऱ्या होत असून जेमतेम १ हजारांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात आले. यातून दिवसाला काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार तर सोडाच, साधा इंधनाचा खर्चही निघत नसल्याने हा विस्ताराचा घाट घातलाच कशाला, असा सवाल परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी केला आहे. या तुघलकी निर्णयाचा तपशील परिवहनमंत्र्यांकडे पाठवावा, तसेच जे लोकप्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनाही हे दाखवावे, असे ते म्हणाले.