कर्जतमध्ये ५९ जागांसाठी २११ उमेदवारी अर्ज

By Admin | Updated: November 10, 2014 00:03 IST2014-11-10T00:03:47+5:302014-11-10T00:03:47+5:30

कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २३ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली

211 nomination papers for 59 seats in Karjat | कर्जतमध्ये ५९ जागांसाठी २११ उमेदवारी अर्ज

कर्जतमध्ये ५९ जागांसाठी २११ उमेदवारी अर्ज

कर्जत : कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २३ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. पाच ग्रामपंचायतींच्या ५९ जागांसाठी तब्बल २११ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
तालुक्यातील आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या नेरळ या मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर कर्जत तालुक्यातील उमरोली, वाकस, वरई तर्फे नीड आणि तिवरे या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका २३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. त्यासाठी निवडणूक होत असलेल्या पाच ग्रामपंचायतींमधील ५९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात नेरळमध्ये १७ जागांसाठी तर, उमरोलीत १३ जागांसाठी तसेच वाकसच्या ११ जागांसाठी याबरोबर वरईतर्फे नीड आणि तिवरे ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
उमरोली ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.एल. मांजरे यांच्याकडे पाच प्रभागातील १३ जागांसाठी ५१ उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले. वाकस ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वैभव विश्वे यांच्याकडे चार प्रभागात एकूण २६ उमेदवार यांनी नामांकन अर्ज दाखल केले. वरई तर्फे नीड ग्रामपंचायतीकडे २६ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: 211 nomination papers for 59 seats in Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.