सानपाडा येथे 21 लाखांची रोकड जप्त

By Admin | Updated: September 19, 2014 02:50 IST2014-09-19T02:50:07+5:302014-09-19T02:50:07+5:30

खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सानपाडा स्थानक परिसरातून 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

21 lakh cash seized at Sanpada | सानपाडा येथे 21 लाखांची रोकड जप्त

सानपाडा येथे 21 लाखांची रोकड जप्त

नवी मुंबई : खंडणीविरोधी पथकाने बुधवारी सानपाडा स्थानक परिसरातून 21 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दोन तरुण बॅगमधून ही रक्कम घेवून चालले होते. या प्रकरणी प्राप्तिकर विभाग आणि वित्त विभाग अधिक तपास करत आहेत. 
दोन तरुण हातात मोठी बॅग घेऊन जात होते. पोलीस निरीक्षक राजन जगताप यांच्या पथकाने त्यांची चौकशी केली. झडतीत 21 लाख 32 हजार 8क्क् रुपये आढळले. नीलेश डुंबरे आणि सतीश दाबी अशी या दोघांची नावे असून ते मुंबईचे राहणारे आहेत. रकमेविषयी समाधानकारक उत्तरे त्यांनी पोलिसांना दिली नाहीत. त्यामुळे त्यांना तुर्भे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शिवाय या रकमेबद्दल निवडणूक अधिकारी, भरारी पथक, वित्त विभाग, आयकर विभाग यांनाही माहिती देण्यात आली. ही रक्कम एपीएमसी मसाला मार्केटमधील ‘कै. वसंतलाल अँड कंपनी’ची असल्याचे समजले. परंतु अधिक उलगडा होऊ शकलेला नाही. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 21 lakh cash seized at Sanpada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.