21 किलो गांजासह दोघांना अटक

By Admin | Updated: November 12, 2014 01:03 IST2014-11-12T01:03:42+5:302014-11-12T01:03:42+5:30

गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 21 किलो गांजा हस्तगत केला.

21 kg ganja and two arrested | 21 किलो गांजासह दोघांना अटक

21 किलो गांजासह दोघांना अटक

मुंबई : गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन आरोपींना अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी 21 किलो गांजा हस्तगत केला.
विक्रोळीच्या गोदरेज कंपनी परिसरात दोन इसम गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथक घाटकोपर युनिटला मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी सायंकाळी या परिसरात सापळा रचला असता, दोन इसम संशयास्पद फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगांमध्ये पोलिसांना 21 किलो गांजा आढळला. त्यानुसार दीपक पवार आणि नाना टकसाळ या आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी नाशिक येथील राहणारे असून, यात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी हे नाशिक येथील राहाणारे असून या गांजाविक्रीच्या रॅकेटमध्ये उएक मोठी टोळी सहभागी असावी, असा पोलिसांचा संशय आहेत. त्यादृष्टीने पोलीसतपास सुरू 
आहे.

 

Web Title: 21 kg ganja and two arrested