देशातील काेराेनाचे २१ टक्के सक्रिय रुग्ण राज्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:05 IST2020-12-06T04:05:29+5:302020-12-06T04:05:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशात सध्या काेराेनाचे ४ लाख ९ हजार ६८९ सक्रिय रुग्ण आहेत, शनिवारी या संख्येत ...

21% of the country's active patients in the state | देशातील काेराेनाचे २१ टक्के सक्रिय रुग्ण राज्यात

देशातील काेराेनाचे २१ टक्के सक्रिय रुग्ण राज्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशात सध्या काेराेनाचे ४ लाख ९ हजार ६८९ सक्रिय रुग्ण आहेत, शनिवारी या संख्येत ६ हजार ३९३ने घट दिसून आली. जागतिक स्तराच्या तुलनेत सक्रिय रुग्णांचे प्रमाण देशात २.१७ टक्के आहे. देशपातळीचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक ८४ हजार ९३८ सक्रिय रुग्ण असून हे प्रमाण २१ टक्के आहे. केरळ राज्यात हे प्रमाण १५ टक्के असून ही संख्या ६१ हजार ५३५ आहे.

दिल्लीत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही तेथील सक्रिय रुग्णसंख्येचे प्रमाण ७ टक्के म्हणजे येथे २८ हजार २५२ सक्रिय रुग्ण आहेत.

नवीन सक्रिय रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने देशातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या एकूण संख्येत सातत्याने घट होत असल्याचे चित्र आहे.

देशात उपचार सुरू असलेल्या कोविड रुग्णांचे प्रमाण शुक्रवारच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ४.४४ टक्क्यांवरून ४.३५ टक्क्यांपर्यंत खाली घसरले. देशात गेल्या २४ तासांत नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक नोंदवली गेली.

देशात सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ पाच राज्यांमध्ये दिसून येत असून यात महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचा समावेश आहे

सर्वाधिक पॉझिटिव्हीटी प्रमाण महाराष्ट्र (१६.५५ टक्के), गोवा (१३.६१ टक्के), चंडीगढ (११.९६ टक्के), नागालँड (९.९ टक्के) आणि केरळ (९.६३ टक्के) असल्याची नोंद आहे.

Web Title: 21% of the country's active patients in the state