Join us  

वर्षभरात विविध दुर्घटनांमध्ये 118 मुंबईकरांचा गेला बळी 

By namdeo.kumbhar | Published: December 29, 2017 5:22 PM

नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला.

मुंबई - नववर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.  2017 चा निरोप देण्यासाठी सगळे सज्ज झाले आहेत. पण सरतेवर्षी मुंबकरांना अनेक दुर्घटनांचा सामना करावा लागला. यामध्ये रेल्वे, आगीमध्ये होरपळून मृत्यू आणि इमारत कोसळण्याची घटना यासारख्या दुर्घटनांमध्ये 118 निष्पापांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. यावरुन अनेक आरोप - प्रत्यारोपही झाले. जाणून घेऊया अशाच काही 2017मध्ये मुंबईत घडलेल्या मोठ्या दुर्घटनांबद्दल.  

  • कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा बळी -

लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आगीत गुदमरून 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात 11 महिला आणि 3  पुरुषांचा समावेश आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना केईएम आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेत्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. क्लबमध्ये मोकळ्या जागेचा बेकायदा वापर होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं आहे. तसंच जी साऊथ वॉर्ड  सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळ यांची बदली करण्यात आली आहे. 

  • एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू - 

29 सप्टेंबर 2017 (शुक्रवार) हा दिवस रेल्वे प्रवाशांसाठी खरोखरचा ब्लॅकफ्रायडे ठरला. पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन स्थानकात अफवा पसरून तुफान चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू आला तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. यावरून अनेक वादविवाद झाले अजूनही सुरूच आहेत. एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली. प्रवाशांचा उद्रेक, राजकीय मोर्चे यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं अशी चर्चा सुरू झाली. आता एल्फिन्स्टन स्थानकावरील पूल लष्कराकडून बांधला जातो आहे.  

  • 12 कामगारांचा होरपळून मृत्यू  - 

साकीनाका येथे पहाटे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. साकीनाक्याच्या खैरानी रोडवरील मखारीया कम्पाऊंडमध्ये असलेल्या भानू फरसाण गाळा नंबर-१ या दुकानाला पहाटे भीषण आग लागली. यावेळी भानू फरसाण दुकानासह इतर दुकानातील कामगार झोपेत होते. अचानक लागलेल्या या आगीमुळे काही कळायच्या आत 12 कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.  ही आग इतकी भीषण होती की, कामगारांना त्यांचा जीवही वाचविता आला नाही. चोहोबाजूंनी आगीचे लोळ उठल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी येईपर्यंत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. 

  • भेंडीबाजार दुर्घटनेत 34 जणांचा बळी - 

भेंडीबाजार येथे दाटीवाटीच्या परिसरात उभी असलेली 117 वर्षे जुनी हुसैनी इमारत कोसळून 34 जणांचा बळी गेला. 47 जणांची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली तर दुर्घटनेत 15 जखमी झाले. भेंडीबाजार परिसरातील 250 इमारतींचा सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट या ट्रस्टकडून पुनर्विकास सुरु झाला होता. मे 2017 मध्ये हुसैनी इमारत पाडण्याची परवानगीही मिळाली होती. समूह विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना मृत्यूने गाठले 

  • घाटकोपर इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू - 

घाटकोपरमधील दामोदर पार्कजवळील सिद्धी साई ही चार मजली इमारत कोसळून17 जणांचा मृत्यू झाला तर 11 जखमी झाले.  ही इमारत 1981 मध्ये बांधण्यात आली होती. पालिकेच्या नियमानुसार 30 वर्षांनी इमारतीचे स्टक्चरल ऑडित होणे आवश्यक आहे. मात्र 36 वर्ष होऊनही इमारतीचं स्टक्चरल ऑडिट झाले नव्हते. या इमारतीमध्ये 12 कुटुंब वास्तव्यास होते.

  • पावसाचे 12 बळी - 29 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसांमध्ये 12 मुंबईकरांचा मृत्यू झाला होता. 250 मिलीमीटर पाऊस पडला होता. सलग दिवस मुंबई-ठाण्याला अक्षरश: झोडपून काढले. दक्षिण मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाचा जोर प्रचंड होता. त्यात वाराने मुंबईकरांची दैना झाली. बोरीवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बीकेसी, माहीम, दादर, वरळी, महालक्ष्मी, गिरगाव, मरिन ड्राईव्ह, कुलाबा, भायखळा, लालबाग, परळ, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि मुलुंड येथे पावसाने धुमाकूळ घातला. दादरच्या हिंदमाता येथे पाणी साचल्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला. पावसामुळे भायखळा, लालबाग, परळ, माटुंगा आणि सायन येथे वाहतुकीचा वेग मंदावला.  

 

  • 6 जणांचा मृत्यू -  23 जानेवारी रोजी दाना बंदर या भागामध्ये एल.सी.सी कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत सहा जणांता मृत्यू झाला होता. 
टॅग्स :मुंबईकमला मिल अग्नितांडवकमलामिल्समुंबईत पावसाचा हाहाकारएलफिन्स्टन चेंगराचेंगरी