Join us

2014 ची निवडणूक मोदींच्या नावावर जिंकली, आता ही निवडणूक मोदींच्या कामावर जिंकू - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 20:37 IST

2014ची लोकसभा निवडणूक आम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर जिंकली होती. आता 2019 ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाच्या जोरावर जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबई - 2014ची लोकसभा निवडणूक आम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर जिंकली होती. आता 2019 ची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाच्या जोरावर जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबईतील बीकेसी येथील एमएमआरडीएच्या मैदावर झालेल्या महायुतीच्या सभेत उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जंगलातली निवडणूक होती त्यांना वाटलं सरकार येईल म्हणून त्यांनी सोबत एक पोपटपण घेतला. पण, सिंह वाघाची जोडी एकत्र आली आहे. वाघ कोण आणि सिंह कोण हे सर्वांना माहीत आहे. २०१४ मोदीजींच्या नावाने जिंकली २०१९ ची मोदीजींच्या कामाने जिंकणार. तिसरा टप्पा झालाय. खात्रीने सांगतो २०१४ लाट होती तर आता त्सुनामी आहे. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार असतानाही परवानग्या मिळाल्या नाहीत. मोदीजींच्या काळात सर्व परवानग्या मिळाल्या. मालमत्ता कर माफीची घोषणा उद्धवजींनी केली, तोही मागणी मान्य केली. २०११ पर्यंत प्रत्येक गरिबाला घर देण्याचा निर्णय केला. ही विकासाची निवडणूक तशीच राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक आहे. सैन्याच शौर्य आधी पण होतं पण निर्णय घेणार राजकीय नेतृत्व नव्हता. ते मोदीजींनी दाखवलं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसलोकसभा निवडणूकमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019