Join us

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल पुरोहितसह अन्य आरोपींवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:10 IST

2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले.

मुंबई - 2008 साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित याच्यासह अन्य आरोपीविरोधात मंगळवारी एनआयएकडून आरोप निश्चित करण्यात आले. साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहितसह अन्य सात आरोपींविरोधात दहशतवादी कट आखणे, हत्या आणि अन्य आरोप ठेवण्यात आले आहेत. आपल्याविरोधात आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्यासाठी कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य व्यक्तींनी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने सोमवारी फेटाळून लावली होती. 

आरोप निश्चित करण्यात आल्यानंतर सर्व सातही आरोपींनी आपल्याविरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, हायकोर्टाने एनआयएचे वकील संदेश पाटील यांना पुढील सुनावणीपर्यंत कर्नल पुरोहित यांनी दिलेल्या एका अर्जाचे उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. 

 

२९ सप्टेंबर २००८ रोजी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील भिक्कू चौक येथील मशिदीजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह अन्य आरोपींना एटीएसने अटक केली होती. 

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटन्यायालय