मुंबईत २०० जणांनी घेतली स्पुतनिक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:08 IST2021-07-14T04:08:06+5:302021-07-14T04:08:06+5:30
मुंबई : गेल्या काही स्पुतनिकच्या लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात मंगळवारपासून ...

मुंबईत २०० जणांनी घेतली स्पुतनिक लस
मुंबई : गेल्या काही स्पुतनिकच्या लसीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात मंगळवारपासून स्पुतनिकचे लसीकरण सुरू झाले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच दिवशी २०० जणांनी लस घेतली आहे. दोन डोसदरम्यान २१ दिवसांचे अंतर असणार आहे. लसीकरण सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या वेळेत कोविन ॲपवर पूर्व नोंदणीसह उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिन, कोविडशिल्ड आणि स्पुतनिक व्ही या तीनही लसी मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये मुंबईकरांना उपलब्ध आहेत.
मुंबईतील लसीकरण मोहिमेबाबत वॉकहार्ट हॉस्पिटलचे प्रादेशिक प्रमुख डॉ. पराग रिंदानी म्हणाले, 'आतापर्यंत आम्ही मुंबईकरांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी दिल्या आहेत, आता गेल्या दोन दिवसांपासून आम्ही स्पुतनिक व्ही लस देण्यास सुरुवात केली आहे. आम्ही दोन्ही वयोगटांसाठी स्पुतनिक व्ही लस देण्यासाठी कोविन ॲपमार्फत २०० अपॉइंटमेंट्स बुक केल्या आहेत. लस घेणे हा स्वत:ला कोविडपासून वाचवण्याचा एकमात्र मार्ग आहे.