मुंबईत २०० जणांची धरपकड
By Admin | Updated: March 16, 2016 08:36 IST2016-03-16T08:36:58+5:302016-03-16T08:36:58+5:30
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. वरळी, भांडूप, विक्रोळी, कुरार, देवनार, वांद्रे व चेंबूर येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मुंबईत २०० जणांची धरपकड
मुंबई : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. वरळी, भांडूप, विक्रोळी, कुरार, देवनार, वांद्रे व चेंबूर येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी सुमारे २०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून रात्री त्यांची सुटका केली.
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास वरळीतील मेला हॉटेल जंक्शनजवळ ४० ते ५० कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. भांडूपमधील सोनापूर जंक्शनजवळ आंदोलन झाले. माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.