एनसीबीकडून २०० किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST2021-01-13T04:12:35+5:302021-01-13T04:12:35+5:30

दोन बहिणींसह परदेशी नागरिकास अटक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पश्चिम उपनगरात विविध ...

200 kg cannabis seized from NCB | एनसीबीकडून २०० किलो गांजा जप्त

एनसीबीकडून २०० किलो गांजा जप्त

दोन बहिणींसह परदेशी नागरिकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) पश्चिम उपनगरात विविध छापे टाकून तब्बल दोनशे किलो गांजा जप्त केला. तर अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन सख्या बहिणींसह एका परदेशी नागरिकाला अटक केली. राहिला फर्निचरवाला, तिची बहीण शहिस्ता फर्निचरवाला आणि करण सजनानी अशी त्यांची नावे आहेत.

शाहिस्ता हिने बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीकडे काही काळ मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे. तर सजनानी याच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या तिघांच्या चौकशीतून बॉलीवूडच्या ड्रग्ज रॅकेटमधील आणखी काही नावे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनसीबीच्या पथकांनी शुक्रवारपासून ठिकठिकाणी धाडसत्रे सुरू ठेवली आहेत. स्वतंत्रपणे टाकलेल्या छाप्यात पश्चिम उपनगरात तीन ठिकाणांहून दोन महिला आणि एका ब्रिटिश नागरिकाला अटक केली आहे. त्यांच्या घरी तपासणीमध्ये एकूण जवळपास २०० किलो गांजा सापडला आहे.

Web Title: 200 kg cannabis seized from NCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.