Join us

सकाळी कॉलेजला आली अन् गेटवरच कोसळली; रुग्णालयात नेताच २० वर्षीय तरुणीला मृत केलं घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:42 IST

कांदिवलीतील २० वर्षीय तरुणी महाविद्यालयाच्या गेटवरच कोसळली होती.

Mumbai News: महाविद्यालयाच्या गेटवरच एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मुंबईच्या कांदिवलीमध्ये घडली. अचानकच रक्तदाब कमी झाल्याने २० वर्षीय तरुणी महाविद्यालयाच्या गेटजवळच कोसळली होती. तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यापूर्वी देखील या विद्यार्थिनीला अशाच प्रकारचा त्रास झाला होता. मात्र यावेळी ती जीवाला मुकली. या घटनेमुळे कुटुंबियांमध्ये आणि महाविद्यालायमध्ये शोककळा पसरली आहे.

 गुरूवारी सकाळी ९ च्या सुमारास दिवलीच्या निर्मला महाविद्यालयाच्या गेटवर हा सगळा प्रकार घडला. हर्षिता पाल (२०) असं मृत तरुणीचे नाव आहे. हर्षिता कांदिवलीच्या हनुमान नगर मध्ये राहत होती. निर्मला महाविद्यालयाच्या विद्यान शाखेच्या आयटी विषयाच्या शेवटच्या वर्षात ती शिकत होती. नेहमीप्रमाणे गुरूवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास ती महाविद्यालयात आली. मात्र गेटजवळच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यामुळे तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल आलं. मात्र उपचारादरम्यान,  तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.रक्तदाबाची पातळी कमी झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा असं डॉक्टरांनी सांगितलं.

हर्षिताला रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे यापूर्वी सुध्दा तिला दोन वेळा असाच त्रास झाला होता. मात्र यावेळी हा त्रास तिच्या जीवावर उठला. आम्ही तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे समता नगर पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या महिन्यात पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारत संध्या पाठक नावाच्या मुलीने आयुष्य संपवलं होतं. साठ्ये महाविद्यालयात ती तिसऱ्या वर्षाला शिकत होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत होती. नैराश्यामुळे तिने  इमारतीवरुन उडी मारली होती.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस