ठाणे, पालघर जिल्ह्यात २० हजार मुले शाळाबाह्य

By Admin | Updated: February 13, 2015 22:47 IST2015-02-13T22:47:01+5:302015-02-13T22:47:01+5:30

प्राथमिक शिक्षणाचे सार्वित्रकीकरण करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून हक्काच्या शिक्षणाची अंमलबजावणी सर्वत्र युद्ध पातळीवरु न सुरु असतांना ठाणे,पालघर जिल्ह्यात २० हजार शाळाबाह्य मुले

20 thousand children out of school in Thane, Palghar | ठाणे, पालघर जिल्ह्यात २० हजार मुले शाळाबाह्य

ठाणे, पालघर जिल्ह्यात २० हजार मुले शाळाबाह्य

भरत उबाळे, शहापूर
प्राथमिक शिक्षणाचे सार्वित्रकीकरण करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून हक्काच्या शिक्षणाची अंमलबजावणी सर्वत्र युद्ध पातळीवरु न सुरु असतांना ठाणे,पालघर जिल्ह्यात २० हजार शाळाबाह्य मुले त्यांच्या पालकांच्या स्थलांतरामुळे
हक्काच्या शिक्षणा पासून वंचित राहिली आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ हा राज्यात २०१० पासून लागू करण्यात आला. शाळाबाह्य बालके, विखुरलेल्या वस्त्यावरील बालके, शहरी भागातील बालके, अल्पसंख्याक प्रवर्गातील बालके, विशेष गरजा असलेली बालके, वंचित घटकांतील बालके, अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त जमातीमिधल बालके यांच्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले होते. मात्र अभियानातून सुमारे ६ ते १४ वयोगटातील बालके वंचित राहील्याने स्थलांतरीतांच्या मुलांच्या शैक्षणकि हक्काचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एकीकडे आदिवासी, दुर्गम भागात सर्वशिक्षा अभियानाला अपयश आले असतांना सर्वशिक्षा मोहीमेच्याच धर्तीवर शासनाने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळाना लागू केले आहे.
२०१२-२०१३ मध्ये राज्याची माध्यमिक शिक्षणातील गळती सुद्धा १३.९६ टक्के आहे. दुसरीकडे माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचीदेखिल गरज भासू लागली आहे. यावर प्रशासनाने तातडीने काही उपाय करण्याची गरज आहे.

Web Title: 20 thousand children out of school in Thane, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.