बोईसरला २० टक्के मशीन राखीव

By Admin | Updated: October 9, 2014 01:11 IST2014-10-09T01:11:39+5:302014-10-09T01:11:39+5:30

बोईसर विधानसभा क्षेत्रातील व्होटींग मशीन सिलींगचे काम बुधवारी पूर्ण झाले. कर्मचाऱ्यांना निवडणुक प्रक्रिये संदर्भातील ट्रेनिंगचे दोन टप्पे पूर्ण झाले आहे

20 percent of Boisar machines are reserved | बोईसरला २० टक्के मशीन राखीव

बोईसरला २० टक्के मशीन राखीव

बोईसर : बोईसर विधानसभा क्षेत्रातील व्होटींग मशीन सिलींगचे काम बुधवारी पूर्ण झाले. कर्मचाऱ्यांना निवडणुक प्रक्रिये संदर्भातील ट्रेनिंगचे दोन टप्पे पूर्ण झाले आहे. आज वोटींग मशीनमध्ये मतपत्रीका फीडकरून ती मशिन व्यवस्थित चालतात की नाही याचे टेस्टींग घेण्यात आले.
तिसरा व अखेरचा टप्पा १४ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती बोईसर निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी दावभट यांनी दिली. बोईसर विधानसभा क्षेत्रात एकुण ३३४ मतदान केंद्र असून आज एकूण ४२५ व्होटींग मशीन्स सील करण्यात आली आहेत. त्यापैकी २० टक्के मशिन्स् ही राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे अठराशे कर्मचाऱ्यांना सहभागी केले आहे. निवडणुक साहित्याचे वाटप १४ आॅक्टोबरला होणार आहे. आज पर्यंत आचार संहितेचा भंग झाल्यासंदर्भात एकही तक्रार दाखल झाली नसल्याचे दावभाट यांनी सांगितले.

Web Title: 20 percent of Boisar machines are reserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.