Join us

लालबागमध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 20 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 10:37 IST

cylinder blast in Lalbaug मुंबई महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून दोन मोठे पाण्याचे टँकरही पाठविण्यात आले आहेत.

मुंबई : मुंबईतील लालबागमधील गणेशगल्ली येथील  साराभाई बिल्डिंगमध्ये आज सकाळी सातच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये २० जण जखमी झाले आहेत. 

मुंबई महापालिकेचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून दोन मोठे पाण्याचे टँकरही पाठविण्यात आले आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे.  जखमींपैकी 16 जणांना केईएममध्ये तक 4 जणांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

लालबाग येथील साराभाई बिल्डिंग गॅस गळती दुर्घटनेतील जखमींची महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.

 

टॅग्स :गॅस सिलेंडरस्फोट