चाेराकडून २० दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:06 IST2021-04-16T04:06:27+5:302021-04-16T04:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई, ठाणे येथून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. लवेश अंकुश ...

20 bikes seized from four | चाेराकडून २० दुचाकी जप्त

चाेराकडून २० दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई, ठाणे येथून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. लवेश अंकुश वाडे (२७) असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीविरुद्ध मुलुंड, नवघर पोलीस ठाणे तसेच कोळशेवाडी, विठ्ठलवाडी, उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम यांना माहिती मिळाली हाेती. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले, पुढे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला असता, वाडेने मुलुंड, नवघर पोलीस तसेच कोळशेवाडी, विठ्ठलवाडी, उल्हासनगर ठाणे शहर या परिसरातून एकूण २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करुन २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

गाडीचे इंजिन नंबर चेसिस नंबर प्राप्त करण्यात आले असून त्यांच्या मूळ मालकांचा पाेलीस शोध घेत आहोत. तर यात पाच दुचाकीवर वाहन क्रमांक नसल्याचे समाेर आले आहे. वाडे हा कल्याणचा रहिवासी आहे. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

.............................

Web Title: 20 bikes seized from four