लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात ‘आयसीएफ’कडून १५ डब्यांच्या २ नवीन लोकल उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी १ दाखल झाली असून, यामुळे आणखी १७ फेऱ्या एप्रिल महिन्यामध्ये चालवण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी दिली. त्यामुळे १५ डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या संख्या आता २२७ वरून २४४ होणार असून मे महिन्यापर्यंत ती २५० पार जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेच्या १५ डब्यांच्या धिम्या लोकल सेवा वांद्रे स्थानकापर्यंत धावण्यासाठी मार्ग मोकळा होत आहे. अंधेरी-वांद्रेदरम्यान असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड, वांद्रे या प्लॅटफॉर्मची लांबी १२ डब्यांच्या लोकल थांबवण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. ते पूर्ण झाल्यानंतरच विरार ते वांद्रे धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल धावणार आहेत. हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याने प्रवाशांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
३३ टक्के क्षमता थेट वाढते
१५ डब्यांची लोकल सेवा वाढवण्यासाठी आणखी रेक आवश्यक असल्याने आम्ही रेल्वे बोर्डाकडे आणखी रेक लवकरात लवकर मिळण्यासाठी आम्ही मागणी केली होती. त्यानुसार सध्या १५ डब्यांच्या पूर्ण बनावटीचे २ रेक मिळत आहेत. तर येत्या काळामध्ये आणखी रेक आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. १५ डब्यांच्या फेऱ्या वाढवल्यामुळे ३३ टक्के क्षमता थेट वाढते. मागच्या काळामध्ये वाढवलेल्या सेवांमुळे ४५ हजार प्रवासी अतिरिक्त प्रवास करत असून येत्या काळामध्ये त्यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक पंकज सिंह म्हणाले.
Web Summary : Western Railway receives two new 15-car local trains, increasing services by 17 in April. This raises the number of 15-car local trips from 227 to 244, expected to surpass 250 by May. Platform extensions at key stations will facilitate smooth operation, adding capacity for 45,000 more passengers.
Web Summary : पश्चिम रेलवे को दो नई 15-कोच लोकल ट्रेनें मिलीं, जिससे अप्रैल में 17 सेवाएं बढ़ेंगी। इससे 15-कोच लोकल यात्राओं की संख्या 227 से बढ़कर 244 हो जाएगी, जो मई तक 250 को पार करने की उम्मीद है। प्रमुख स्टेशनों पर प्लेटफॉर्म विस्तार से सुचारू संचालन होगा, 45,000 अधिक यात्रियों के लिए क्षमता बढ़ेगी।