Join us

पेटत्या रॉकेटने दोन लाखांची राेकड जळाली, मीराराेडमध्ये आगीत घरातील सामानही जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 07:29 IST

नया नगरमधील फिरोज शेख यांच्या घरात रात्री १०.२० च्या सुमारास पेटते रॉकेट शिरून घराला आग लागली. घरात कोणी नव्हते. आगीत कपाटात ठेवलेले दोन लाखांचे नोटांचे बंडल जळाले. 

मीरारोड : फटाक्यांमुळे मीरा-भाईंदरमध्ये आगीच्या २५ पेक्षा  जास्त घटना घडल्या असून एका घटनेत तर घरातील सामानासह दोन लाखांचे नोटांचे बंडल जळून खाक झाले. नया नगरमधील फिरोज शेख यांच्या घरात रात्री १०.२० च्या सुमारास पेटते रॉकेट शिरून घराला आग लागली. घरात कोणी नव्हते. आगीत कपाटात ठेवलेले दोन लाखांचे नोटांचे बंडल जळाले. 

१० लाखांचे नुकसान - अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. शेख कुटुंबीयांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. आगीमुळे इमारतीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. - शहरात २३ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांनी सांगितले. गोडदेव नाका येथे एका गाळ्यात, गीता नगरमध्ये एका घराला आग लागली होती.  

टॅग्स :मीरा रोड