‘लीलावती’च्या माजी विश्वस्ताला 2 लाखांचा जामीन

By Admin | Updated: November 27, 2014 02:18 IST2014-11-27T02:18:12+5:302014-11-27T02:18:12+5:30

सक्तवसुली संचालनालयाच्या एका प्रकरणात बुधवारी लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त किशोर मेहता यांना अटक केली.

2 lakh bail for ex-trustee of Lilavati | ‘लीलावती’च्या माजी विश्वस्ताला 2 लाखांचा जामीन

‘लीलावती’च्या माजी विश्वस्ताला 2 लाखांचा जामीन

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या एका प्रकरणात बुधवारी लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त किशोर मेहता यांना अटक केली. त्यानंतर  अतिरिक्त महानगर दंडाधिका-यांनी त्यांना दोन लाख रुपयांचा जामीन मंजूर केला़ 
मेहता यांनी 1995-2क्क्2 या काळात 2क् लाख डॉलरचे हिरे निर्यात केले होत़े याच्या नोंदीत घोळ असल्याने संचालनालयाने मेहता यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला़ या प्रकरणात विशेष न्यायालयाने वारंवार नोटीस जारी करूनही मेहता हजर झाले नाहीत.अखेर न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल़े त्यानुसार मेहता यांना आज अटक झाली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली़ त्यानंतर मेहता यांनी जामिनासाठी अर्ज केला़ न्यायालयाने तो मंजूर केला़ (प्रतिनिधी)

 

Web Title: 2 lakh bail for ex-trustee of Lilavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.