मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:25 IST2021-02-05T04:25:01+5:302021-02-05T04:25:01+5:30

मुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले ...

2 lakh 92 thousand 225 patients are coronary free in Mumbai | मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबईत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ६२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहर उपनगरात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख ४७ हजार ३६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५०३ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख १० हजार १३४ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३७३ झाला आहे.

Web Title: 2 lakh 92 thousand 225 patients are coronary free in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.