Join us  

1993 मुंबई बॉम्बस्फोट : आरोपी दाऊद इब्राहिमचा साथीदार फारुख टकलाला मुंबईत आणलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 9:14 AM

1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार फारुक टकलाला दुबईत अटक करुन मुंबईत आणण्यात आले आहे.

मुंबई - 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्वासू साथीदार फारुक टकलाला दुबईत अटक करुन मुंबईत आणण्यात आले आहे. गुरुवारी (8 मार्च) सकाळी एअर इंडियाच्या विमानानं फारुकला मुंबईत आणण्यात आले. यानंतर त्याला टाडा कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे.

1993 बॉम्बस्फोटानंतर 1995मध्ये फारुकविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. 1993 मुंबई बॉम्बस्फोटानंतर फारुक टकलानं भारतातून पळ काढला होता. फारुख टकला हा मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या गँगमध्ये होता. दाऊदच्या विश्वासू साथीदारांपैकी तो एक होता. 1993च्या बॉम्बस्फोटांचा कट रचण्यात त्याचा देखील सहभाग होता.

काय आहे नेमके प्रकरण?12 मार्च, 1993 साली मुंबईमध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. या स्फोटात 257 निष्पापांचा बळी गेला होता, तर 700 हून अधिक जण जखमी झाले होते.याप्रकरणी 129 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. 

 

 

 

टॅग्स :दाऊद इब्राहिम