194 crore water bars are pending at Government Offices | सरकारी कार्यालयांकडे २१९१ कोटींची पाणीपट्टी थकीत

सरकारी कार्यालयांकडे २१९१ कोटींची पाणीपट्टी थकीत

मुंबई : केंद्र व राज्य शासन, म्हाडा, रेल्वे या सरकारी कार्यालयाने जल व मलनिस्सारण आकारापोटी महापालिकेचे तब्बल २१९१ कोटी रुपये थकविले आहेत. त्यामुळे थकित रक्कम एकाचवेळी भरल्यास थकबाकीदारांना अतिरिक्त दोन टक्के आकार माफ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
केंद्र, राज्य शासन, म्हाडा, रेल्वे यांच्याकडे गेल्या काही वर्षांपासून पालिकेच्या जल व मलनि:सारण खात्याची ३० जून २०१९ पर्यंत तब्बल २१९१ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. नगरसेवकांच्या विनंतीनुसार थकीत रकमेवर आकारण्यात येणारा दोन टक्के अतिरिक्त आकार माफ करण्याची तयारी प्रशासनाने दाखविली. त्यानुसार स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला.
त्यास सर्वपक्षीय सदस्यांनी मंजुरी दिली.
>विकासकामांचा धूमधडाका
विधानसभा निवडणुकीचे बिगूल लवकरचं वाजणार आहे. यामुळे विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडे कमी अवधी राहिला आहे. त्यामुळे या आठवड्यात दररोज स्थायी समितीची बैठक घेऊन तुंबलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. चार बैठकांमध्ये आतापर्यंत सुमारे दोन हजार कोटींहून अधिक विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 194 crore water bars are pending at Government Offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.