मलेशियात अडकलेले 19 विद्यार्थी दोन दिवसांत येणार

By Admin | Updated: August 9, 2014 02:16 IST2014-08-09T02:16:55+5:302014-08-09T02:16:55+5:30

मलेशियात अडकलेल्या ठाण्यातील 19 विद्याथ्र्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून, ते आता भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत.

19 students stuck in Malaysia are coming in two days | मलेशियात अडकलेले 19 विद्यार्थी दोन दिवसांत येणार

मलेशियात अडकलेले 19 विद्यार्थी दोन दिवसांत येणार

>ठाणो : मलेशियात अडकलेल्या ठाण्यातील 19 विद्याथ्र्याचा सुटकेचा मार्ग मोकळा झाला असून, ते आता भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली आहेत. त्यांना येत्या एक ते दोन दिवसांत मायदेशात आणण्यात येणार आहे. याबाबत, शिवसेनेच्या खासदारांनी परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांची भेट घेऊन त्यांना मायदेशी आणण्याची मागणी केली होती.
ठाण्यातील एसईएस कॉलेज ऑफ हॉटेल अॅण्ड टुरिझम मॅनेजमेंटमधील 19 विद्यार्थी चांगल्या नोकरीसाठी मलेशियात गेले होते. त्यांना नेणा:या एजंटने त्यांचे पासपोर्ट आणि व्हिसा ताब्यात घेतल्याने त्यांच्या परतीचा मार्ग बंद झाला होता; तसेच त्यांना सफाई कामगार म्हणून तेथे काम करावे लागत होते. व्हिसा बोगस ठरवून त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या खासदारांनी  संस्थेचे संचालक मिलिंद कोळी यांच्यासह केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती.  या विद्याथ्र्याना सुखरूप मायदेशी आणण्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानुसार, त्यांनी भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली त्यांना एक-दोन दिवसांत मायदेशात आणण्यात येणार असल्याचा निरोप शिंदे यांना मिळाला आहे.  (प्रतिनिधी)

Web Title: 19 students stuck in Malaysia are coming in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.