१८ लाखांचे कोकेन जप्त
By Admin | Updated: October 30, 2015 00:39 IST2015-10-30T00:39:21+5:302015-10-30T00:39:21+5:30
अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना बुधवारी पायधुनी पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला

१८ लाखांचे कोकेन जप्त
मुंबई : अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन नायजेरियन नागरिकांना बुधवारी पायधुनी पोलिसांनी अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी १८ लाख रुपये किमतीचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला असून यामध्ये एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात अमली पदार्थांच्या तस्करीत मोठी वाढ झाली आहे. अशाच प्रकारे दोन इसम मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी मस्जिद बंदर परिसरात येणार असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील केवळेकर यांनी एक पथक तयार करून परिसरात सापळा रचला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अजिज ओलाले आणि बारतीलोमियो उडीयार हे दोन्ही आरोपी घटनास्थळी आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ १८ लाखांचे कोकेन पोलिसांना आढळले.