पनवेलमध्ये १७३० किलो रक्तचंदन जप्त

By Admin | Updated: February 24, 2015 01:03 IST2015-02-24T01:03:31+5:302015-02-24T01:03:31+5:30

पनवेलजवळील गोडावूनवर छापा टाकून पोलिसांनी जवळपास २६ लाख रुपये किमतीचे १७३० किलो रक्तचंदन जप्त केले आहे.

1730 kg of blood sugar seized in Panvel | पनवेलमध्ये १७३० किलो रक्तचंदन जप्त

पनवेलमध्ये १७३० किलो रक्तचंदन जप्त

नवी मुंबई : पनवेलजवळील गोडावूनवर छापा टाकून पोलिसांनी जवळपास २६ लाख रुपये किमतीचे १७३० किलो रक्तचंदन जप्त केले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
उरण, पनवेल परिसरामध्ये रक्तचंदनाची तस्करी वाढली आहे. महामार्गावर शिरढोणजवळील एक गोडावूनमध्ये चंदनाचा साठा असल्याची माहिती पनवेल पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने २१ फेब्रुवारीला या ठिकाणी धाड टाकली. १७३० किलो वजनाचे एकूण ६५ नग सापडले. या प्रकरणी आरीफ सैवाल अल्ली साई, प्रतिशे मुकादम व सुमीत शिवकुमार या तीघांना अटक केली. या तिघांनाही २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरासे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 1730 kg of blood sugar seized in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.