Join us

दंड है प्रचंड... १७० कोटी फुकट्यांकडून वसूल; पश्चिम रेल्वेचा कारवाईचा बडगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:28 IST

पश्चिम रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २५ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७० कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

मुंबई :

पश्चिम रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २५ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७० कोटीपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. यामध्ये ४३.०७ कोटी रुपये दंड एकट्या मुंबई उपनगरी विभागात वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये सखोल तिकीट तपासणी करते.  विनातिकीट  प्रवास आणि इतर अनियमिततेमुळे होणाऱ्या अशा महसुलावर वरिष्ठ अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एप्रिल २०२२ ते मार्च  २०२३ या कालावधीत विनातिकीट / अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण  २५. ६३ लाख प्रकरणे आढळून आली, या प्रकरणांमधून १७०.३५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ५०  टक्क्यांनी वाढल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई लोकल