Join us

म्युझिक कॉन्सर्टमध्ये १७ मोबाइल लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 12:31 IST

वनराई पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : गोरेगाव पूर्वेतील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या एका म्युझिक कॉन्सर्टच्या दरम्यान १७ मोबाइल फोन चोरीला गेले. या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुरुवारी अनोळखी व्यक्तीविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला.

तक्रारदार वैष्णवी बजाज (२३, रा.चिंचोली बंदर, मालाड पश्चिम) या भावासह २४ डिसेंबरच्या रात्री नेस्को प्रदर्शन केंद्रातील हॉल क्रमांक ५ येथे एका संगीत कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोबाइल फोन खिशात ठेवला होता. २५ डिसेंबरला मध्यरात्री १:१५च्या सुमारास मोबाइल तपासला असता, तो त्यांना आढळला नाही. भावाच्या मदतीने त्यांनी हॉलमध्ये आणि अन्य ठिकाणी मोबाइलचा शोध घेतला. मात्र, तो त्यांना सापडला नाही.

या फोनची किंमत २९ हजार रुपये असून, या प्रकरणी त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार दिली असता, अशाच प्रकारे अजून १६ जणांचे फोन चोरीला गेल्याचे उघड झाले. चोरीला गेलेल्या सर्व फोनची किंमत एकूण सात लाख ५१ हजार रुपये आहे. या प्रकरणी वनराई पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस