Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांवर लवकरच १७ मेघदूत मशिन्स

By नितीन जगताप | Updated: August 29, 2022 20:49 IST

विशेष म्हणजे, या १७ मशिन्समधून हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, कुर्ला, ठाणे, घाटकोपर आणि विक्रोळी या सहा स्थानकांवर एकूण १७ मेघदूध मशिन्स बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या मशीनमधून हवेपासून पाण्याची निर्मिती होणार आहे. मुंबई विभागातील प्रमुख सहा रेल्वे स्थानकावर १७ मशिन्स लावण्याकरिता मे. मैत्री ॲक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाच वर्षांसाठी कंत्राट दिले आहे. यातून मध्य रेल्वेच्या तिजोरीत वर्षाला २५ लाख ५० हजार रुपयांचा महसूल जमा होणार आहे.

विशेष म्हणजे, या १७ मशिन्समधून हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच हवेपासून उपलब्ध झालेल्या पाण्यावर अनेक प्रक्रिया करण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकात पाच, दादर स्थानकात पाच, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकात प्रत्येकी एक, ठाणे स्थानकात चार आणि विक्रोळी स्थानकात एक असा १७ मशिन्स बसविण्यात येणार आहेत.

वॉटर वेंडिंग मशीन अडीच वर्षांपासून बंदआयआरसीटीसीच्या रेल्वे स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिन आर्थिक गणित बिघडल्याने अडीच वर्षांपासून बंद पडल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर चकरा माराव्या लागत होत्या. परिणामी प्रवाशांची गैरसोय होत होती.

टॅग्स :रेल्वेमध्य रेल्वे