१७ कार्यकर्त्यांना माटुंग्यात अटक
By Admin | Updated: March 27, 2016 01:29 IST2016-03-27T01:29:42+5:302016-03-27T01:29:42+5:30
हैदराबाद विद्यापीठ आणि फर्ग्युसन महाविद्यालयात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यास परवानगी नाकारल्याने आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशने माटुंगा पोलीस ठाण्याबाहेरच धिंगाणा

१७ कार्यकर्त्यांना माटुंग्यात अटक
मुंबई : हैदराबाद विद्यापीठ आणि फर्ग्युसन महाविद्यालयात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यास परवानगी नाकारल्याने आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशने माटुंगा पोलीस ठाण्याबाहेरच धिंगाणा घातल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या १७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. निषेध नोंदविण्याच्या निदर्शनांना माटुंगा पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिल्यानंतर जाब विचारण्यासाठी सायंकाळी साडे सातच्या सुमारास आॅल इंडिया स्टुडंट असोसिएशनच्या २० ते २५ कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. अनेकांनी निषेधाचे झेंडेही फडकावले त्यामुळे १७ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी.एम. काकड यांनी दिली. (प्रतिनिधी)