मुंबईत आढळले स्वाइनचे १६ रुग्ण
By Admin | Updated: March 24, 2015 00:51 IST2015-03-24T00:51:04+5:302015-03-24T00:51:04+5:30
गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवार, २३ मार्चला स्वाइनचे फक्त १६ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत,

मुंबईत आढळले स्वाइनचे १६ रुग्ण
साऊथ आफ्रिकन वृद्धाचा मृत्यू
मुंबई : गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाढत असलेल्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवार, २३ मार्चला स्वाइनचे फक्त १६ रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत, तर, एका साऊथ आफ्रिकन वृद्धाचा स्वाइन फ्लूमुळे मुंबईत मृत्यू झाला आहे.
साऊथ आफ्रिकेतून आलेल्या ७७ वर्षीय पुरूषास स्वाईनची लागण झाली होती. १४ मार्च रोजी या पुरूषास होली स्पिरीट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची प्रकृती उपचारादरम्यान खालावली आणि त्याचा सोमवारी मृत्यू झाला. मुंबई बाहेरून एक महिला आणि एक मुलगी उपचारासाठी मुंबईत दाखल झाल्या आहेत. दोघींवरही उपचार सुरु आहेत. नव्या रुग्णांमध्ये ११ महिलांचा आणि ५ पुरूषांचा समावेश आहे. ११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर, पाच जण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)