कडक निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी १६ गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:07 IST2021-04-08T04:07:52+5:302021-04-08T04:07:52+5:30
मुंबईत २० मार्च २०२० ते ६ एप्रिल २०२१ पर्यंत विविध पोलीस ठाण्यांत २८ हजार ४३ गुन्हे दाखल झाले ...

कडक निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी १६ गुन्हे
मुंबईत २० मार्च २०२० ते ६ एप्रिल २०२१ पर्यंत विविध पोलीस ठाण्यांत २८ हजार ४३ गुन्हे दाखल झाले असून, उत्तर विभागात सर्वाधिक १० हजार ८२१ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात, कोरोनाचे संशयिताविरुद्ध ३५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, हॉटेल आस्थापना ४०८, पान टपरी १६१, इतर दुकाने १,५५८, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ११,२३८ तर अवैध वाहतूक प्रकरणी ३,१०४ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध ११ हजार ७६१ गुन्हे नोंद आहेत.
सोमवारपासून सुरू झालेल्या ‘मिनी लॉकडाऊन’च्या पहिल्या दिवशी हॉटेल आस्थापना संबंधित (९), इतर दुकाने (२), अवैध वाहतूक प्रकरणी (२) असे एकूण १६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मंगळवारीदेखील काही ठिकाणी दुकानदार दुकाने उघडण्याच्या प्रयत्नात होते. मात्र मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे दुकानदारांचे शटर डाऊन होते. शासनाच्या या निर्बंधाबाबत व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण कायम आहे.