महेश कोले -
मुंबई : एप्रिल २०१८ ते एप्रिल २०२४ या सहा वर्षांच्या कालावधीत राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या बसचे १५ हजार ७६७ अपघात झाले. यामधील अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई म्हणून महामंडळाकडून ३७८ कोटी नऊ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
एसटी बसच्या अपघातांमध्ये काही प्रवासी गंभीर जखमी झाले, तर काहींना जीव गमवावा लागला. महामंडळाच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये १९ हजार ५६४ जण जखमी झाले, तर २ हजार चारजणांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांना नियमांनुसार नुकसानभरपाई देण्यात येते. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या ज्येष्ठ मुलगा किंवा अविवाहित ज्येष्ठ मुलगी यांना नुकसानभरपाई देण्याचे धोरण स्वीकारणारे एसटी महामंडळ हे भारतातील पहिलेच महामंडळ असल्याचा दावा महामंडळाने केला.
एसटीचा एक रुपयांचा विमाप्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत एसटी महामंडळाकडून तिकिटाच्या दरामधील १ रुपया विम्यासाठी राखून ठेवला जातो. या रकमेच्या माध्यमातून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा विमा उतरविला जातो.
अपघाती नुकसानभरपाईसंदर्भातील प्रकरणे न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित राहू नयेत यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने प्रकरणे निकाली काढण्याची पद्धत १९८५ पासून सुरू करण्यात आली.
Web Summary : Over six years, 15,767 accidents involving ST buses occurred. The corporation disbursed ₹378 crore as compensation to victims. 19,564 were injured, and 2,004 died. ST allocates ₹1 from each ticket for passenger insurance and uses Lok Adalats for faster claim settlements.
Web Summary : पिछले छह वर्षों में, एसटी बसों से जुड़ी 15,767 दुर्घटनाएँ हुईं। निगम ने पीड़ितों को ₹378 करोड़ का मुआवजा दिया। 19,564 घायल हुए, और 2,004 की मौत हो गई। एसटी यात्री बीमा के लिए प्रत्येक टिकट से ₹1 आवंटित करता है और दावों के तेजी से निपटान के लिए लोक अदालतों का उपयोग करता है।