१५३ जणांनी भरले नेत्रदानाचे अर्ज

By Admin | Updated: October 26, 2014 23:58 IST2014-10-26T23:58:14+5:302014-10-26T23:58:14+5:30

आँखे है सदा के लिये या वाक्याची तंतोतंत प्रचिती कर्जतच्या वासरे खोंड्यातील नागरिकांनी दाखविली.

153 people filled with eyeballs | १५३ जणांनी भरले नेत्रदानाचे अर्ज

१५३ जणांनी भरले नेत्रदानाचे अर्ज

विजय मांडे, कर्जत
आँखे है सदा के लिये या वाक्याची तंतोतंत प्रचिती कर्जतच्या वासरे खोंड्यातील नागरिकांनी दाखविली. आपल्या पश्चात आपल्याच डोळ्यांनी हे जग पहाता येईल यासाठी कर्जतच्या वासराच्या खोंड्यातील लोकांनी नेत्रदानासाठी पावले उचलली असून १५३ जणांनी अर्ज केले आहेत.
तालुक्यातील वासराच्या खोंडयातील सांगावी येथे गीता फाउंडेशन, कर्जत मेडिकल असोसिएशन, तिरु पती बालाजी मित्र मंडळ आणि सुधाकर भाऊ मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने सुधाकर घारे यांच्या वाढिदवसानिमित्त लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या सहकार्याने नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात या परिसरातील १५३ जणांनी आपले नेत्रदानाचे अर्ज भरून दातृत्व सिध्द केले. विशेष म्हणजे या उपक्र मात असंख्य दानशूर व्यक्ती अर्ज भरणार होते, परंतु संयोजकांनी पुढील शिबिरात अर्ज भरा असे सांगितले.
नेत्रदान शिबिराचे आयोजन गीता घारे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सभागृहात करण्यात आले होते. रवींद्र घारे आणि जगदीश देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे सचिव संजय खडे यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी व्यासपीठावर डॉ. मिलिंद सोनावणे, सुधाकर घारे, डॉ. श्रीकांत डहाके आदी उपस्थित होते. लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माधुरी भट यांनी नेत्रदानाबाबत माहिती सांगून एका व्यक्तीचे नेत्रदान दोन जणांना दृष्टी देते, हे स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रमोद देशमुख यांनी केले, त्यानंतर सर्वप्रथम सुधाकर घारे यांनी सपत्नीक नेत्रदानाचा अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी झुंबड लागली. या शिबिरास आ. सुरेश लाड, नगराध्यक्ष राजेश लाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास थोरवे, उपनगराध्यक्ष लालधारी पाल, आदींनी भेट दिली. बंडू तुरडे, मधुकर घारे यांनी शिबिर यशस्वी केले.

Web Title: 153 people filled with eyeballs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.