150 दांडीबहाद्दरांवर कारवाई करणार!
By Admin | Updated: October 2, 2014 22:49 IST2014-10-02T22:49:30+5:302014-10-02T22:49:30+5:30
अधिकारी व कर्मचा:यांनी एकसंघ व समन्वयाने निवडणूक कामकाज करावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (जनरल) के.श्रीनिवासलू यांनी अलिबाग येथे केले.

150 दांडीबहाद्दरांवर कारवाई करणार!
>अलिबाग: निवडणूकविषयक कामकाज अतिशय महत्त्वाचे असून अधिकारी व कर्मचा:यांनी एकसंघ व समन्वयाने निवडणूक कामकाज करावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (जनरल) के.श्रीनिवासलू यांनी अलिबाग येथे केले.
अलिबाग विधानसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिका:यांच्यावतीने आयोजित केलेल्या अधिकारी, कर्मचा:यांच्या प्रशिक्षणादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे, अलिबाग विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक क्षीरसागर, निवडणूक निरीक्षकांचे समन्वय अधिकारी किरण भिलारे आदि उपस्थित होते.
श्रीनिवासलू म्हणाले, निवडणुका घेणो ही अतिशय अवघड जबाबदारी असून त्या यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाज चांगले सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी सर्व अधिकारी, कर्मचा:यांनी दक्ष रहावे. आताचा काळ हा सोशल मीडियाचा असल्याने आपले कार्य तातडीने पोहोचते. आचारसंहितेचा भंग होऊ नये, याचीही काटेकोरपणो खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. ईव्हीएम मशीनबाबत सर्व संबंधित अधिका:यांनी सविस्तर माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचा:यांचे आभार मानले, तसेच यावेळी या विधानसभेसाठीही निवडणुका निर्भयमुक्त, शांततामय, नि:पक्षपातीपणो होण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले.
कर्मचा:यांवर कार्यवाही
हे प्रशिक्षण मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांच्यासाठी होते. अलिबाग विधानसभा मतदार संघात 365 मतदान केंद्रे असून त्याठिकाणी हे अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले जातील. त्यामुळे प्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता या प्रशिक्षणास अनुपस्थित असणा:यांवर निवडणूक कायद्याप्रमाणो कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली. या प्रशिक्षणास 1817 अधिकारी, कर्मचारी उपस्थित असणो आवश्यक असताना 1667 उपस्थित होते. गैरहजर असणा:या 15क् जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करु न प्रशिक्षणासंदर्भात थोडक्यात माहिती दिली, तसेच प्रशिक्षण केंद्रावर निर्माण करण्यात आलेल्या सोयी-सुविधा त्याचप्रमाणो प्रत्यक्ष मतदानाची कार्यवाही कशाप्रकारची होईल हे प्रशिक्षणार्थींना दाखविण्यासाठी उभारलेले डमी मतदान केंद्र निवडणूक निरीक्षकांना दाखवले. (विशेष प्रतिनिधी)
सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाचीच राहील
च्श्रीनिवासलू म्हणाले, निवडणुका घेणो ही अतिशय अवघड जबाबदारी असून त्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदारसंघात निवडणूकविषयक कामकाज चांगले सुरु आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी सर्व अधिकारी, कर्मचा:यांनी दक्ष रहावे. आताचा काळ हा सोशल मीडियाचा असल्याने आपले कार्य तातडीने पोहोचते. आचारसंहितेचा भंग होऊ नये, याचीही काटेकोरपणो खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.