Join us  

किल्ले संवर्धनासाठी केंद्राकडून १५० कोटी - खासदार संभाजी राजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 5:51 AM

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून १५० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातून राज्यातील दहा किल्ल्यांचा विकास करण्यात येईल.

मुंबई - गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून १५० कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातून राज्यातील दहा किल्ल्यांचा विकास करण्यात येईल. तसेच गड संवर्धनासाठी रायगड प्राधिकरणाच्या पुढाकाराने ११ फेब्रुवारी रोजी रायगडावर एक दिवसीय दुर्ग परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मंत्रालयात दिली.मंत्रालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत संभाजी राजे म्हणाले की, दुर्ग परिषदेत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि दोनशे शिवप्रेमी संघटनांच्या प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सध्या या किल्ल्यांची अवस्था प्रत्येक शिवपे्रमीला दु:ख देणारी आहे. काही शिवप्रेमी स्वत:हून किल्ल्यांच्या जतानासाठी प्रयत्न करतात, मात्र त्यांना कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.रायगड संवर्धनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. अत्तापर्यंत ८०० पायऱ्या तयार झाल्या असून उरलेल्या एक हजार पायºया जूनपूर्वी तयार होतील.गडाच्या पायथ्याला ८८ एकर जमीन संपादित केली असून यावर विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. रायगडचा ऐतिहासिक ठेवा कायम ठेवून हा आराखडा राबविला जात आहे. किल्ल्याचे काम पूर्ण व्हायला आणखी सहा ते सात वर्ष लागतील असे सांगून रायगड एक हेरिटेज हिलस्टेशन व्हावे ही आपली भूमिका आहे, असे खा. संभाजी राजे म्हणाले.प्रतापगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, देवगिरी, शिवनेरी, सोलापूरचा जुना किल्ला, रायगड किल्ला यासह विदभार्तील दोन किल्ल्यांसाठी केंद्रीय वित्त आयोगाकडून १५० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे समभाजी राजे यांनी सांगितले.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमहाराष्ट्र