राज्यात कोरोनाच्या १४६ नवीन रुग्णांची नोंद, मुंबईत ३१ नवे रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती

By संतोष आंधळे | Updated: January 5, 2024 20:56 IST2024-01-05T20:55:53+5:302024-01-05T20:56:06+5:30

मुंबईत जे ३१  रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णाला  आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

146 new patients of Corona have been recorded in the state, 31 new patients in Mumbai; Information from the Department of Health | राज्यात कोरोनाच्या १४६ नवीन रुग्णांची नोंद, मुंबईत ३१ नवे रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती

राज्यात कोरोनाच्या १४६ नवीन रुग्णांची नोंद, मुंबईत ३१ नवे रुग्ण; आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये शुक्रवारी  राज्यात एकूण १४६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ३१ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ९३१  आणि मुंबईत १६१ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  तसेच आज १२९ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत जे ३१  रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णाला  आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १६ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ६९४ चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण

मुंबई मनपा - ३१
ठाणे - ५
ठाणे मनपा - २५
नवी मुंबई मनपा - ११
कल्याण-डोंबिवली मनपा -३
मीरा भाईंदर मनपा -१
पालघर -१
रायगड -३
पनवेल मनपा - ५

Web Title: 146 new patients of Corona have been recorded in the state, 31 new patients in Mumbai; Information from the Department of Health