राज्यात कोरोनाचे १४४, मुंबईत २९ नवे रुग्ण
By संतोष आंधळे | Updated: January 11, 2024 19:15 IST2024-01-11T19:15:36+5:302024-01-11T19:15:50+5:30
राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे.

राज्यात कोरोनाचे १४४, मुंबईत २९ नवे रुग्ण
मुंबई: राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये गुरुवारी राज्यात एकूण १४४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील २९ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ८२४ आणि मुंबईत १६३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज १६९ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे २९ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी २० बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ७६८ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - २९
ठाणे -१
ठाणे मनपा - ९
नवी मुंबई मनपा -२०
कल्याण डोंबिवली - ४
उल्हासनगर मनपा - १
रायगड -१
पालघर -१
पनवेल मनपा - २