१४ वर्षाच्या अवनीने केले १०० किल्ले सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:07 IST2021-03-07T04:07:30+5:302021-03-07T04:07:30+5:30
मुंबई : मुंबईतील १४ वर्षांच्या अवनी धानमेहेर हिने १०० गडकिल्ले सर केले आहेत. अवनी दादर येथील पाटकर गुरुजी विद्यालयात ...

१४ वर्षाच्या अवनीने केले १०० किल्ले सर
मुंबई : मुंबईतील १४ वर्षांच्या अवनी धानमेहेर हिने १०० गडकिल्ले सर केले आहेत. अवनी दादर येथील पाटकर गुरुजी विद्यालयात नववी इयत्तेत शिकते. ती मूळची डहाणू तालुक्यातील चिंचणी दांडेपाडा येथील आहे. अवनीचे आई - वडील निस्सीम गडप्रेमी असल्यामुळे तिला लहानपणापासूनच गडकिल्ले भ्रमंतीचे बाळकडू मिळाले. साल्हेर सालोटा गड, मोरागड, मुल्हेरगड, हरगड, न्हावीगड, कोरीगड, धनगड, तैलबैला गड, पुरंदर, लोहगड, तीकोणा, शिवनेरी, हडसर, बारडगड, विश्रामगड असे अनेक अवघड किल्ले तिने पादक्रांत केले आहेत. ५० वा किल्ला धर्मवीर गड ७५ वा मेहेकर किल्ला यानंतर सिंहगड ते राजगड अशी पदभ्रमंती करून राजगड हा १०० वा किल्ला तिने सर केला. या कामगिरीबद्दल तिच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.