१४ उत्पादन संघ-कं पन्या !

By Admin | Updated: January 17, 2015 23:08 IST2015-01-17T23:08:49+5:302015-01-17T23:08:49+5:30

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. या शेतकऱ्यांचे गट स्थापन करुन त्या गटांच्या समूहाची ‘उत्पादक संघ-कंपनी’ स्थापन करून आर्थिक उन्नती करण्याची ही योजना आहे.

14 production association-paniya! | १४ उत्पादन संघ-कं पन्या !

१४ उत्पादन संघ-कं पन्या !

जयंत धुळप ल्ल अलिबाग
महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. या शेतकऱ्यांचे गट स्थापन करुन त्या गटांच्या समूहाची ‘उत्पादक संघ-कंपनी’ स्थापन करून आर्थिक उन्नती करण्याची ही योजना आहे.
जिल्ह्यात सुमारे ३ लाख शेतकरी असले तरी अपेक्षित प्रमाणात त्यांच्या गटांची स्थापना झालेली नाही. सद्यस्थितीत या प्रकल्पांतर्गत ७५० तर अन्य ५२ असे ८०२ शेतकरी गट जिल्ह्यात आहेत. त्यांचा समन्वय साधून ‘उत्पादक संघ-कंपनी’स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु असून जिल्ह्यात १४ कंपन्या स्थापन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पाचे रायगड जिल्हा कृषी पणन तज्ज्ञ एम.एन. माने यांनी दिली.
सद्यस्थितीत खालापूर भाजीपाला उत्पादक संघ ही एकमेव ‘उत्पादक संघ-कंपनी’ जिल्ह्यात आहे. अशाच प्रकारे अलिबाग, माणगांव, खालापूर व पेण या तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्याने एकट्याने प्रयत्न करण्यापेक्षा सामूहिकरीत्या प्रयत्न केल्यास फायदा होतो आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते.
बचत गटाच्या धर्तीवर शेतकरी उत्पादक गटांची निर्मिती व त्यांची क्षमता बांधणी करून उत्पादक संघ-कंपनीमध्ये रुपांतर करण्याचे काम महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत करण्यात येत असल्याचे माने यांनी सांगितले.
शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्रांतर्गत उत्पादक कंपन्यांनी गावस्तरावर मूलभूत सुविधा चाळणी यंत्र, प्रतवारी मशीन, उत्पादित मालाचे पॅकिंग इत्यादी बाबींचा अवलंब करण्यात येणार आहे. शेतमालास योग्य भाव मिळून गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शेतमालाची उत्पादकता वाढविणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे.
शेतकरी उत्पादक गट, उत्पादक कंपनी व शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्राचे टप्पे एमओसीपी प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातून विक्री योग्य शेतमाल असणाऱ्या भागातून जेथे शेतकऱ्यांना उत्पादक कंपनी निर्माण करण्याची इच्छा आहे, अशा समान पीक घेणाऱ्या (धान्य व फळे भाजीपाला) शेतकऱ्यांचे उत्पादक गट तयार करणे. ३ ते ५ कि.मी.परिसरातीललगतच्या गावातून १५ते २० अशा शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात येत आहे. १५ ते २० पात्र शेतकरी उत्पादक गटांचे एकत्रीकरण करून त्याच्या उत्पादक कंपनीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.
या कंपनीचे व्यवस्थापन हे शेतकरी सभासदांच्या हाती गांव स्तरावर राहाणार असून त्याला कायदेशीर दर्जा राहाणार आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याकरिता आत्मा प्रकल्प संचालक, वेश्वी नर्सरी अलिबाग येथे संपर्क साधावा असे आवाहनही माने यांनी अखेरीस केले आहे.

च्प्रकल्पाअंतर्गत राज्यात एकूण ४०० उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असून यापैकी २०० कंपन्या धान्य-तेलबिया व २०० कंपन्या फळे-भाजीपाला या प्रकारच्या असतील तर प्रत्येक जिल्हानिहाय १४ उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ कंपन्या धान्य-तेलबिया व ७ फळे-भाजीपाला या प्रकारच्या असतील.
च्उत्पादक कंपनी नोंदणीकृत असल्याने त्याला कायदेशीर दर्जा असेल. एका विशिष्ट उद्देशापोटी उत्पादक घेणारे ३ ते ५ कि.मी. अंतरामधील १५ ते २० उत्पादक किंवा ३०० ते ३५० शेतकऱ्यांनी मिळून एका विशिष्ट उद्देशाने व ध्येयाने स्थापन केलेली उत्पादक कंपनीने निर्माण केलेले सुविधा केंद्र म्हणजे शेतकरी सामुदायिक सुविधा केंद्र राहाणार
आहे.

Web Title: 14 production association-paniya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.