Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘परे’वर १४ तासांचा ब्लॉक; लोकल सेवांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 09:15 IST

अनेक लोकल सेवा रद्द असतील. 

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई :पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी ते गोरेगाव स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी- रविवारी १४ तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे अनेक लोकल सेवा रद्द असतील. 

ब्लॉक शनिवारी रात्री १२ ते रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत असेल. या ब्लॉकमुळे अंधेरी आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावर चालवल्या जातील आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे राम मंदिर स्थानकावर थांबणार नाही. मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा वांद्रे स्थानकापर्यंत चालविण्यात येतील.  याशिवाय दुपारी १२.१६ आणि २. ५० वाजताची चर्चगेट- बोरिवली लोकल विरारपर्यत धावेल. बोरिवलीहून दुपारी १. १४ आणि ३. ४० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द असेल. त्याऐवजी दोन अतिरिक्त जलद लोकल विरारहून चर्चगेटसाठी दुपारी १.४५ व ४. १५ वाजता सोडल्या जातील.

या लोकल सेवा रद्द 

दुपारी १.५२ सीएसएमटी- गोरेगाव लोकल, सकाळी १०. ३७ ची पनवेल - गोरेगाव लोकल, दुपारी १२.५३ ची गोरेगाव- सीएसएमटी लोकल, दुपारी. १२.१४ ची गोरेगाव- पनवेल लोकल

 

टॅग्स :पश्चिम रेल्वे