म्हाडाच्या १४ इमारती अतिधोकादायक घोषित

By Admin | Updated: May 17, 2015 00:34 IST2015-05-17T00:34:30+5:302015-05-17T00:34:30+5:30

पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या इमारतींच्या सर्वेक्षणानंतर म्हाडाने मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत.

14 buildings of MHADA have declared hyperactive | म्हाडाच्या १४ इमारती अतिधोकादायक घोषित

म्हाडाच्या १४ इमारती अतिधोकादायक घोषित

मुंबई : पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या इमारतींच्या सर्वेक्षणानंतर म्हाडाने मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. या इमारतीमधील ५३७ रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याचे काम म्हाडातर्फे हाती घेण्यात येणार असून, या प्रक्रियेत रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केले आहे.
वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश महेता यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, २००० सालच्या झोपडीधारकांच्या पात्रता नियमात बदल करण्यात आला आहे. हस्तांतर शुल्क निवासी ४० हजार तर अनिवासी शुल्क ६० हजार असणार आहे. या प्रस्तावावर शनिवारीच स्वक्षारी करण्यात आली आहे. जुन्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देण्यात येणार आहे. सुस्थितीत असलेल्या इमारतींचा उपकर रद्द करण्यात येणार आहे. या इमारती खाजगी विकासकांना पुनर्विकासासाठी देण्यात येणार असून, त्यासाठी आर.आर बोर्डाची गरज भासणार नाही.
दरम्यान, गतवर्षी दहा इमारती अतिधोकादायक होत्या तर यावर्षी या यादीत चार इमारतींची भर पडली आहे. (प्रतिनिधी)

च्१४४, एम. जी. रोड एक्स्पनेंड मेन्शन
च्४४-४६ काजी स्ट्रीट /९४-१०२,मस्जिद स्ट्रीट
च्९८-१०२,अली उमर स्ट्रीट
च्१८८-१९० डॉ. विगास स्ट्रीट
च्४२-४८ मंगलदास रोड
च्१-१३ विठ्ठलदास रोड
च्२३०-२३४ संत सेना महाराज मार्ग
च्११०-११४ संत सेना महाराज मार्ग
च्२६ खारवा गल्ली
च्३९ चौपाटी सी फेस
च्५५-५७ नागदेवी क्रॉस लेन
च्२४४ नरशीनाथ स्ट्रीट
च्इ.क्र २२९-२३५ लक्ष्मण निवास डॉ आंबेडकर मार्ग लालबाग
च्इ.क्र ९६फ मथुरा भवन दादासाहेब फाळके रोड दादर

Web Title: 14 buildings of MHADA have declared hyperactive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.