1386 सफाई कामगारांचा मृत्यू !
By Admin | Updated: March 19, 2015 00:57 IST2015-03-19T00:57:59+5:302015-03-19T00:57:59+5:30
गेल्या सहा वर्षात मुंबई पालिकेच्या १३८६ सफाई कारगारांचा विविध आजारांनी बळी गेल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.

1386 सफाई कामगारांचा मृत्यू !
गेल्या सहा वर्षात मुंबई पालिकेच्या १३८६ सफाई कारगारांचा विविध आजारांनी बळी गेल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.
मुंबईतील सफाई कामगारांच्या आरोग्याकडे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याची बाब भाजपा सदस्य विजय गिरकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केली.
फुटपाथ, रस्ते, नाले सफाई करणा-या कामगारांचा विविध आजाराने मृत्यू होत असताना मुंबई महापालिका मात्र आरोग्य सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गिरकर यांनी केला.