मुंबई : राज्यात इंग्रजी शाळांचे पेव फुटले असताना, पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोकºयांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात राज्यातील ५,००२ शाळांमध्ये १०पेक्षा कमी पटसंख्या दिसून आली. या ५,००२ शाळांमधील ४,३५३ शाळा जिल्हा परिषदेच्या तर ६९ शाळा खासगी अनुदानित आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जवळच्या शाळेत सामावून घेण्यात येत आहे, तसेच ० ते १० मुलांची पटसंख्या असलेल्या ४,४२२ शाळांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून १,३१४ शाळांचे स्थलांतरण जवळच्या शाळेत करण्यात येणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.राज्यातील ९०९ शाळा स्थलांतरित करता येणार नाहीत, असे लक्षात आल्याने त्या बंद करण्यात येणार नाहीत. यामध्ये गडचिरोली येथील १३७, चंद्रपूरमधील १६, सिंधुदुर्गमधील ३५, ठाणे ४४, रत्नागिरी येथील १२५, रायगड येथील १०७ आणि सातारा येथील १०७ शाळांचा समावेश असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.मुंबई विभागात बंद होणा-या शाळामुंबई उपनगर १ठाणे ४५पालघर ३२रायगड १०३
१,३१४ मराठी शाळा बंद; विद्यार्थीच मिळेनात, शिक्षकांच्या नोक-या मात्र राहाणार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 5:25 AM