१,२३६ इमारती धोकादायक

By Admin | Updated: May 19, 2014 04:57 IST2014-05-19T04:57:03+5:302014-05-19T04:57:03+5:30

गेल्या वर्षभरात चार इमारत दुर्घटनानंतरही इमारत दुरुस्तीविषयी नागरिकांची उदासीनता आणि पालिका प्रशासनाची हतबलताच दिसून येत आहे़

1,236 buildings are dangerous | १,२३६ इमारती धोकादायक

१,२३६ इमारती धोकादायक

 मुंबई : गेल्या वर्षभरात चार इमारत दुर्घटनानंतरही इमारत दुरुस्तीविषयी नागरिकांची उदासीनता आणि पालिका प्रशासनाची हतबलताच दिसून येत आहे़ परिणामी गतवर्षीच्या तुलनेत धोकादायक इमारतींच्या संख्येत यंदा २५ टक्के वाढ झाल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणातून उजेडात आली आहे़ यात भेंडी बाजार, डोंगरी व मालाडमधील सर्वाधिक धोकादायक इमारतींचा समावेश आहे़ दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील धोकादायक इमारती, दरड परिसर, किनारपट्टी परिसरातील धोका आणि पाणी तुंबण्याच्या ठिकाणांचे सर्वेक्षण पालिकेमार्फत केले जाते़ सर्वाधिक धोकादायक ठरणार्‍या वॉर्डमध्ये खबरदारीच्या उपाययोजना आखण्यासाठी हे सर्वेक्षण केले जाते़ परंतु मर्यादित अधिकार, अधिकार्‍यांची बेपर्वाई आणि नागरिकांचा स्थालंतरित होण्यास नकार या कारणांमुळे दरवर्षी पावसाळ्यात हजारो रहिवासी मृत्यूच्या छायेखाली दिवस काढत असतात़ (प्रतिनिधी)

Web Title: 1,236 buildings are dangerous