खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाला एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत १२ हजार ३३२ कोटी ६२ लाखांचा महसूल मिळाला. २०२४ च्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीपेक्षा त्यात ११.०९ % वाढ झाली. गतवर्षी ११ हजार १०१ कोटी ३ लाखांचा महसूल मिळाला होता. उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, अमरावती या विभागीय कार्यालयांद्वारे जिल्ह्यांतील कामकाजावर लक्ष ठेवले जाते.
सर्वाधिक ३,०९८ महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. तर, अमरावती विभागाला सर्वांत कमी ८१ कोटींचा महसूल मिळाला. मुंबई शहर जिल्ह्यातील महसुलातही घट झाली आहे. गतवर्षी २९ कोटी ४७ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात घट होऊन यंदा २८ कोटी ८० लाख झाला आहे. ही घट २.२९ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यांत विभागांनुसार जमा झालेली रक्कम
नाशिक ३०९८ कोटी ११ लाखछ.संभाजीनगर ३०११ कोटी ५८ लाख पुणे १४२१ कोटी २७ लाख अहिल्यानगर १२१५ कोटी २८ लाख मुंबई उपनगर १२९ कोटी ६६ लाख ठाणे १७५ कोटी ८० लाख पालघर ८५६ कोटी २१ लाख रायगड ८०२ कोटी ७७ लाख
Web Summary : Maharashtra's excise duty revenue surged to ₹12,332.62 crore between April and September, marking an 11.9% increase from last year. Nashik division led with ₹3,098 crore, while Amravati recorded the lowest. Mumbai city saw a slight revenue decrease of 2.29%.
Web Summary : महाराष्ट्र के उत्पादन शुल्क राजस्व में अप्रैल से सितंबर के बीच ₹12,332.62 करोड़ की वृद्धि हुई, जो पिछले वर्ष की तुलना में 11.9% अधिक है। नासिक विभाग ₹3,098 करोड़ के साथ सबसे आगे रहा, जबकि अमरावती में सबसे कम राजस्व दर्ज किया गया। मुंबई शहर में राजस्व में 2.29% की मामूली गिरावट आई।