टप्प्याटप्प्याने सामावणार ११७२ शिक्षकांना
By Admin | Updated: May 17, 2015 23:36 IST2015-05-17T23:36:15+5:302015-05-17T23:36:15+5:30
जिल्हा विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात समाविष्ट झालेल्या शिक्षकांना विकल्पाद्वारे ठाणे जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सामावून

टप्प्याटप्प्याने सामावणार ११७२ शिक्षकांना
ठाणे : जिल्हा विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात समाविष्ट झालेल्या शिक्षकांना विकल्पाद्वारे ठाणे
जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सामावून घेतले जाणार आहे. यामध्ये सुमारे एक हजार १७२ शिक्षकांचा समावेश आहे.
त्यासाठीचे प्रयत्न ठाणे जिल्हा परिषदेने सुरू केले आहेत.
ठाणे किंवा पालघर या दोन्ही जिल्ह्यांपैकी कोणत्यातरी एकाच जिल्ह्यात राहण्याचा किंवा जाण्याचा विकल्प कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. यापैकी पालघरमधून ठाणे जिल्ह्यात येणाऱ्यांमध्ये शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे, तर
ठाण्यातून पालघरमध्ये जाणाऱ्यांमध्ये केवळ सात शिक्षकांचा समावेश
आहे. पण, या दोन्ही जिल्ह्यांत असलेल्या रिक्त जागांच्या संख्येवरून शिक्षकांना सोडणे किंवा सामावून घेणे शक्य होणार आहे. पण, ठाण्यात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद संबंधित शिक्षकांना टप्प्याटप्प्याने सामावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. तसा दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये पत्रव्यवहारही झाला आहे. ठाणे जि.प.मध्ये केवळ २७७ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पालघरच्या शिक्षकांना ठाण्यात टप्प्याटप्प्याने सामावून घेण्याचा निर्णय ठाणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी संबंधित शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी पालघर जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार सुरु केला आहे. (प्रतिनिधी)