फोर्टमधील कंपनीची ११० कोटींची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:36 IST2018-06-26T02:36:22+5:302018-06-26T02:36:26+5:30

फोर्टमधील एका कंपनीची ११० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा

110 crore fraud in company of Fort | फोर्टमधील कंपनीची ११० कोटींची फसवणूक

फोर्टमधील कंपनीची ११० कोटींची फसवणूक

मुंबई : फोर्टमधील एका कंपनीची ११० कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शेअर खरेदी विक्रीचे खोटे व्यवहार दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
बोरीवली येथील रहिवासी असलेल्या व्यावसायिक महिलेच्या तक्रारीवरून २२ जून रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये दोन शेअर्स ब्रोकर कंपन्यांसह कंपनीचे संचालक संजय शहा, अध्यक्ष मुकेश शहा आणि एका कार्यकारी संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००९ ते २०१५ या सहा वर्षांत या काळात कंपनीला हा गंडा घालण्यात आला. आरोपींनी एका कंपनीसाठी अन्य कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले होते.
त्यानंतर, या शेअर्सच्या विक्रीचे खोटे व्यवहार दाखविले. त्यावर खोटे विलंबीत देयक शुल्क आकारला, तसेच एका कंपनीचे शेअर्स विकण्यास कंपनीने सांगितले असतानाही ते न विकता स्वत: बळकावले. त्यामुळे कंपनीला तब्बल ११० कोटींचे नुकसान झाले.

Web Title: 110 crore fraud in company of Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.