Join us

भाईंदरच्या इना पॅलेसमधील 11 अनधिकृत खोल्या जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 21:05 IST

लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई

भाईंदर : भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानकासमोर असलेल्या इना पॅलेस या लॉजिंग बोर्डिंगमधील ११ अनधिकृत खोल्यांचे बांधकाम महापालिकेने तोडून टाकले. या लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या सतत तक्रारी होत्या. त्यामुळे पोलिसांनी बेकायदा लॉज, बारची बांधकामे तोडण्यासाठी पत्रव्यवहार चालवला होता. गेल्या डिसेंबर महिन्यात पालिकेने आतील खोल्यांचे बेकायदा बांधकाम तोडले होते. पण लॉज चालकाने पुन्हा खोल्या बांधल्या. आयुक्त बालाजी खतगांवकर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त माधव कुसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती ३ चे प्रभाग अधिकारी गोविंद परब, कनिष्ठ अभियंता चेतन म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आतील ११ खोल्यांचे बेकायदा बांधकाम तोडून टाकले. यावेळी प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे, जगदीश भोपतराव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले उपस्थित होते.  

टॅग्स :मुंबईभाइंदर