पुजारी टोळीच्या 11 जणांना मोक्का
By Admin | Updated: November 28, 2014 02:25 IST2014-11-28T02:25:16+5:302014-11-28T02:25:16+5:30
दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची तयारी करणा:या गँगस्टर रवी पुजारी टोळीला गुन्हे शाखेने मोक्का लावला आहे.

पुजारी टोळीच्या 11 जणांना मोक्का
मुंबई : दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येची तयारी करणा:या गँगस्टर रवी पुजारी टोळीला गुन्हे शाखेने मोक्का लावला आहे. त्यानुसार आज या गुन्ह्यात अटक झालेल्या 11 आरोपींना विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना 6 डिसेंबर्पयत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गुन्हे शाखेचे मोटार वाहन चोरीविरोधी पथक आणि गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने संयुक्त कारवाईत 13 नोव्हेंबरला खार परिसरातून पुजारी टोळी गजाआड केली. यात इशरत शेख उर्फ राजा, अनीस र्मचट या पुजारीच्या विश्वासू हस्तकांचाही सहभाग आहे. चौकशीत याच टोळीने निर्माते अली-करीम मोरानी यांच्या घरी गोळीबार केला होता, हे स्पष्ट झाले. तसेच दिग्दर्शक भट यांच्या हत्येची तयारीही या टोळीने केल्याची माहिती समोर आली. या गुन्ह्यात गँगस्टर पुजारी व मुंबईतल्या टोळीला अमेरिकेहून पैसे धाडणा:या उबेद र्मचट अशा दोघांना फरार आरोपी दाखविले आहे.